नमस्कार आजच्या या आर्टिकल मध्ये आपण Mahatma Gandhi Information in Marathi (महात्मा गांधी यांची माहिती मराठी मध्ये) बघणार आहोत. महात्मा गांधी कोण होते, त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांचा जीवन परिचय, हे सर्व आपण या आर्टिकल मध्ये बघणार आहोत. त्यांनी स्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान हे अत्यंत महत्वाचे आहे, जे कुठलाही भारतीय विसरु शकत नाही चला तर बघुया Mahatma Gandhi Information in Marathi.
Mahatma Gandhi Information in Marathi (महात्मा गांधी यांची माहिती मराठी)
नाव (Name) | मोहनदास करमचंद गांधी |
जन्म (Birthday) | २ ऑक्टोबर १८६९ |
जन्मस्थान (Birthplace) | पोरबंदर, गुजरात |
वडील (Father Name) | करमचंद उत्तमचंद गांधी |
आई (Mother Name) | पुतळाबाई करमचंद गांधी |
पत्नी (Wife Name) | कस्तुरबा |
मुले (Children’s Name) | हरिलाल, देवदास, मनीलाल आणि रामदास. |
भावंडे (Brother & Sister) | लक्ष्मीदास, करसनदास आणि बहिण तेथेपोरबंदर, गुजरात |
मृत्यूस्थान (Death Place) | नवी दिल्ली, भारत |
मृत्यु (Death) | ३० जानेवारी १९४८ |
महात्मा गांधी यांचा जीवन परिचय :
महात्मा गांधीजींचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते. लोक त्यांना प्रेमाने “बापू” असे म्हणत असे. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ साली गुजरात येथील पोरबंदर येथे झाला. महात्मा गांधींच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी होते, ते दिवाण म्हणून पोरबंदर येथे काम करत होते. त्यांच्या आईचे नाव पुतळाबाई होते. करमचंद गांधी यांचे 4 विवाह झाले होते. पुतळाबाई या त्यांच्या चौथ्या पत्नी होत्या.
पुतळाबाई या अतिशय धार्मिक होत्या. त्यांनी बालवयातच महात्मा गांधीवर धार्मिक संस्कार केले. मोहनदास यांच्यावरती बालवयातच सहिष्णुता, अहिंसा, शाकाहार, व प्राणिमात्रांवर दया करणे या सारखे अनेक सुंदर असे संस्कार त्यांच्या आईकडून गिरवण्यात आले. या संस्कारांचा परिणाम त्यांच्या संपूर्ण जीवनावर बघण्यास मिळतो.
गांधीजींचा जन्म दिवस २ ऑक्टोबर हा गांधी जयंती म्हणून संपूर्ण देशामध्ये साजरा केला जातो. महात्मा नावाची पदवी गांधीजींना रवींद्रनाथ टागोर यांनी दिली होती. सुभाष चंद्रबोस यांनी इसवीसन १९४४ मध्ये प्रथम त्यांना “राष्ट्रपिता” असे संबोधले होते. सुभाषचंद्र बोस यांनी गांधीजींना महात्मा ही पदवी दिली.
महात्मा गांधी यांच्ये शिक्षण :
महात्मा गांधी यांनी आपली मॅट्रिकची परीक्षा सन १९८७ साली उत्तीर्ण केली. त्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी १८८८ साली इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी भारतीय कायदा व सुव्यवस्था यांचा अभ्यास करून बॅरिस्टर ही पदवी संपादन केली. त्यांनंतर ते सन १८९१ साली आपले शिक्षण पूर्ण करून भारतात परत आले.
भारतात परत आल्यानंतर त्यांनी राजकोट येथे आपली वकिली सुरु केली, त्यांनतर त्यांनी आपली वकिली ही मुंबई येथे सुरु केली. त्यानंतर ते सन १८९३ साली वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी भारतीय व्यवसायिकांचे न्यायालयीन सल्लागार म्हणून दक्षिण अफ्रिकेला गेले.
महात्मा गांधी यांचा दक्षिण आफ्रिकेतील प्रवास (१८९३-१९१४) :
दक्षिण आफ्रिके मध्ये गांधीनी आपल्या आयुष्याची २१ वर्ष व्यतीत केली. त्याकाळी दक्षिण अफ्रीका ही इंग्रजांची वसाहत होती. तिकडे इंग्रजांच्या राजवटी मध्ये वर्णभेदावर खुप अन्याय होत होता. तेथे राहिल्यावर महात्मा गांधींना समाजात असणाऱ्या विकलांगपणाची जाणीव झाली.
आपण भारत देशापासून, भारतातील संस्कृति पासून खुप दूर असल्याची जाणीव त्यांना झाली. त्यांनतर त्यांनी तेथील दक्षिण आफ्रिकेमधील भारतीय लोकांच्या समस्या सोडवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी तेथील लोकांची प्रश्न समजुन घेतले अणि ते प्रश्न सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. त्यांना असे वाटत होते की या सर्व कार्यामधून आपण भारत देशाला समजुन घेऊ.
महात्मा गांधींना दक्षिण अफ्रिकेमध्ये खुप वाईट प्रसंगाना सामोरे जावे लागले. त्यातील एक प्रसंग मी तुम्हाला येथे सांगू इच्छितो. दक्षिण अफ़्रीकेमध्ये वर्णभेद खुप मोठ्या प्रमाणात होत होता. गांधीजी रेल्वे चा प्रवास करत असतांना त्यांच्याकडे प्रथम वर्गाचे टिकिट होते. प्रथम वर्गाचे टिकिट असतांनाही तेथील एका रेल्वे अधिकाऱ्याने त्यांना प्रथम वर्गातून बाहेर जावून तिसऱ्या वर्गात जाण्यास सांगितले. परंतु जेव्हा गांधीजींनी या अन्यायाचा विरोध केला तेव्हा त्यांना रेल्वे मधून धक्का मारून बाहेर काढण्यात आले ते खाली पडले.
भारतीय लोकांवर होणारा अत्याचार थांबवण्यासाठी अणि समाजात आपले स्थान बनवण्यासाठी त्यांनी दक्षिण अफ्रिकेतील समाजात विखुरलेल्या भारतीय लोकांना एकत्र करून सन १८९४ साली “नाताळ भारतीय कॉन्ग्रेस” नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला.
महात्मा गांधी यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील संघर्ष – Mahatma Gandhi Aandolan :
महात्मा गांधी यांचे दक्षिण अफ्रिकेतील कार्य बघत ९ जानेवारी १९१५ साली काँग्रेसचे नेता “गोपाल कृष्ण गोखले” यांनी गांधीजींना भारतात बोलवून घेतले. ते गोखल्यांच्या सांगण्यावरून भारतात परत आले. ते आपला राजकीय गुरु म्हणून गोपाल कृष्ण गोखले यांना मानत होते. गोपाल कृष्ण गोखले हे त्यावेळी “भारतीय राष्ट्रीय कॉन्ग्रेसचे” अध्यक्ष होते.
महात्मा गांधींनी स्वातंत्र्यासाठी केलेली काही आंदोलने :
- चंपारण्य सत्याग्रह
- खेडा सत्याग्रह
- अहमदाबाद येथील कामगार लढा
- महात्मा गांधी यांचा खिलाफत चळवळीला पाठींबा
- असहकार चळवळ
- दांडी यात्रा
- महात्मा गांधी यांनी केलेलं हरिजन आंदोलन
- भारत छोडो चळवळ
महात्मा गांधी यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी अतिशय महत्वाचे योगदान दिले आहे. त्यांनी केलेले कार्य कुठलाही भारतीय विसरु शकत नाही.
महात्मा गांधी यांनी लिहिलेली पुस्तके – Mahatma Gandhi’s Books
- इंडिअन होम रूल (हिंद स्वराज्य)
- माझ्या स्वप्नांचा भारत
- गांधीजींची संक्षिप्त आत्मकथा
- नैतिक धर्म
- गांधीजींचे जीवन त्यांच्याच शब्दांत
- गांधी विचार दर्शन: अहिंसाविचार
- गांधी विचार दर्शन: राजकारण
- गांधी विचार दर्शन: सत्याग्रह प्रयोग
- गांधी विचार दर्शन: सत्याग्रह विचार
- गांधी विचार दर्शन: सत्याग्रहाची जन्मकथा
- गांधी विचार दर्शन: हरिजन
FAQ
गांधी जयंती कधी साजरी केली जाते?
गांधी जयंती दरवर्षी 2 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाते.
महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव काय?
महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते.
महात्मा गांधी यांचा मृत्यु कधी झाला?
महात्मा गांधी यांचा मुत्यु ३० जानेवारी १९४८ साली झाला.
गांधीजींच्या पत्नीचे नाव काय होते?
महात्मा गंधिच्या पत्नीचे नाव कस्तूरबा गांधी होते.