स्वयंपाकाच्या भाषेत आपण कॉर्न हा शब्द वापरतो जसे की पॉपकॉर्न, कॉर्न फ्लोअर, कॉर्न स्टार्च, रोस्टेड कॉर्न, बेबी कॉर्न, स्वीट कॉर्न इत्यादि. साधारणपणे, पीक किंवा व्यापाराचा उल्लेख करताना, मका हा शब्द वापरला जातो.
Corn Flour Meaning in Marathi
कॉर्न फ्लोअर म्हणजेच मक्याचं पीठ. कॉर्न फ्लोअरला मराठीत मक्याचं पीठ म्हणतात. मक्याला इंग्रजीत कॉर्न, मेझ (corn, maize) असेही म्हणतात, आणि हिंदीत मक्का किंवा मकई असे म्हणतात. कॉर्नफ्लोअरचा रंग वापरलेल्या कॉर्नच्या प्रकारानुसार बदलतो. हे सहसा पिवळे असते, परंतु ते पांढरे किंवा निळे देखील असू शकते.
कॉर्नफ्लोअर आणि कॉर्नस्टार्च या दोन्हींबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. परंतु कॉर्न फ्लोअर आणि कॉर्न स्टार्च या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. वेगळ्या पद्धतीने प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला कॉर्न फ्लोअर आणि कॉर्न स्टार्च मिळतो. मक्याचा स्टार्च खडबडीत किंवा बारीक स्वरूपात उपलब्ध आहे तर मक्याचे पीठ पांढरे किंवा हलक्या पिवळ्या रंगाच्या पावडरच्या रूपात उपलब्ध आहे. मक्याचे पीठ आणि कॉर्न स्टार्च यातील फरक म्हणजे संपूर्ण मका वाळवून त्याची पावडर बनवली जाते, त्याला मक्याचे पीठ म्हणतात, हे कॉर्न फ्लोअर आहे, ज्यापासून मक्याची भाकरी बनविली जाते. तर मक्याच्या बियांतील पांढरे पिष्टमय अन्तर्बीज पिळून कॉर्न स्टार्च मिळते. कॉर्न स्टार्चचा वापर सॉस आणि सूप घट्ट करण्यासाठी केला जातो. याव्यतिरिक्त, ते पेस्ट म्हणून आणि बेबी पावडर आणि कॉर्न सिरपसाठी वापरले जाते.
यामागेही एक इतिहास आहे, किमान 7000 वर्षांपूर्वी मेक्सिकोमध्ये सर्वप्रथम मका पिकवला गेला. तेथे स्थानिक रहिवासी ते खात असत. मेक्सिकोमध्ये मुबलक असलेले “टिओसिंट” नावाचे जंगली गवत, या पासून कॉर्न तयार झाले. ख्रिस्तोफर कोलंबस भारताचा मार्ग शोधण्यासाठी निघाला आणि त्याने अमेरिका गाठून शोध लावला. त्याने स्थानिक रहिवाशांना मका खाताना पाहिले आणि ते युरोपमध्ये परत आणले आणि तेथून ते उर्वरित जगामध्ये पसरले.
आरोग्याच्या दृष्टीने, त्याच्या उच्च फायबर गुणधर्मांमुळे, मका वजन कमी करण्यासाठी एक अद्भुत धान्य आहे. फायबर पचनास मदत करते ज्यामुळे वजन कमी होते. तसेच मक्यामध्ये चयापचय सुधारणारे अँटिऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असतात.