भारतीय वास्तु शास्त्र टिप्स मराठी | वास्तू दोष उपाय मराठी

वास्तू टिप्स मराठी | वास्तु शास्त्र नियम मराठी

आपल्या भारतीय वास्तुशास्त्रामध्ये वास्तुशास्त्र म्हणजे काय, वास्तुशास्त्रानुसार वास्तुनिर्मिती कशी करावी, दोषविहरीत वास्तु कशी घ्यावी, आहे त्याच वास्तूमधील दोष ओळखून ते कसे दूर करावेत याबद्दल बरीच माहिती मिळते. आजच्या या लेखामध्ये आपण भारतीय वास्तु शास्त्र मराठी मध्ये पाहणार आहोत. सोबतच या लेखामध्ये आम्ही आपल्याला वास्तू दोष उपाय मराठी मध्ये सांगणार आहोत.

भारतीय वास्तुशास्त्र पाहायचे झाल्यास वास्तु बांधण्या आधी योग्य प्लॉट ची निवड कशी करावी, प्लॉट कोणत्या भूपृष्ठावर घ्यावा, प्लॉट ची दिशा कोणती असावी, प्लॉटमधील जिना, बेडरूम हॉल किचन तसेच देवघर हे कोणत्या दिशेला असावे याची सखोल माहिती देणारे शास्त्र म्हणजेच वास्तुशास्त्र होय. ह्या सर्व दिशा आणि त्याची रचना कशी असावी, काय कुठे असावे आणि काय कुठे असू नये, घरासाठी शुभ तसेच अशुभ रंग कोणते या सर्व गोष्टींची माहिती आपल्या प्राचीन विद्वान ऋषीमुनींनीं आधीच नमूद करून ठेवली आहे. ती माहिती योग्यपणे हाताळणाऱ्या अनुभवी व्यक्तीस वास्तुशास्त्रज्ञ अथवा वास्तुविशारद असे म्हंटले जाते. म्हणून घराची निर्मिती वा राहत्या वास्तूचे दोषनिवारण करण्यापूर्वी एखाद्या चांगल्या वास्तुविशारदाचा सल्ला आपण एकदा नक्कीच घ्यावा असे आमचे मत आहे.

इंटरनेटवर तुम्ही जर वास्तु शास्त्र मराठी माहिती शोधत असाल तर तुम्हाला या लेखामध्ये काही ठराविक वास्तु शास्त्र मराठी टिप्स ज्या अनेक वास्तुविशारद आपल्या होम व्हिसिटमध्ये वापरतात त्या वाचायला मिळतील. या सोप्या वास्तू टिप्स मराठी तुमचे वास्तुशास्त्राविषयीचे ज्ञान वाढवण्यास आणि तुमच्या घरातील वास्तुदोष कमी करण्यास नक्कीच मदत करतील. खाली दिलेल्या वास्तु शास्त्र मराठी टिप्स आणि वास्तु शास्त्र नियम एक आनंदी वास्तु बनवण्यासाठी तुमची नक्कीच मदत करतील.


  • दक्षिण दिशेतुन १२ ते ४ या वेळात अतिशय कडक उन घरावरती येत असते आणि या ठिकाणी उतरते छत घराला असेल तर पत्रा, स्लॅब, कौले जास्त तापुन घरात उष्णता वाढते, त्यामुळे प्राणशक्तीचा -हास होतो व घरात चिडचिड, आजारपण, वादविवाद या गोष्टी होतात त्यामुळे दक्षिण दिशेस उतरता पत्रा स्लॅब घेवु नये.
  • आपल्या घरात नित्यनेमाने देवपूजा घरातील प्रमुख व्यक्तीने रोज करावी. देवपूजा घरामध्ये मनशांती, आरोग्य तसेच संरक्षणकवच्या प्रमाणे काम करते. देवतत्वांचे तेजोवलय घरात प्रसन्न वातावरण निर्माण करते. फुले, धुप, अगरबत्ती, निरंजन, कापूर-आरती याने शुभऊर्जा वाढते.
  • ओव्हन म्हणजे एक प्रकारची छोटी भट्टीच असते. यामध्ये अग्नीतत्व जास्त असते. उत्तरेच्या जलतत्वात ठेवल्यास आरोग्य, पैसा, प्रतिष्ठा यांचे नूकसान जास्त होते. महिलांची चिडचिड, आजारपण वाढते. पैसे येण्यास अडथळे येतात. ओव्हन आग्नेय दिशेला ठेवणे उत्तम.
  • आपल्या घरामध्ये सकाळी ७ ते ११ पर्यंत कोवळा सुर्यप्रकाश रोज येणे आरोग्यदायी आहे, यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते. आळस, आजारपण, अपयश राहत नाही. सगळ्यांना विटॅमिन डी योग्य मिळाल्याने त्वचा व हाडे मजबूत होतात, आरोग्य चांगले राहते, यामुळे घराला पुर्व दिशेस खिडक्या दारे असावीत.
  • घरातील महिला आई, आजी, बहीण, बायको, मुलगी, वहीनी या आपल्या घरातील शुभलक्ष्मी आहेत, यांचा नेहमी आदर सन्मान करावा, घरात महिला रडणे ओरडणे दुःखी राहणे, चिडचिड्या आजारी राहणे योग्य नाही. गृहलक्ष्मी सुखी तर आपल्यावर अष्टलक्ष्मी सुखी हे लक्षात घेवुन सर्व महिलांचा आदर सन्मान करावा लक्ष्मी कृपा कायम होते.
  • गाई, म्हशी, बैल ही शेतकऱ्याची खरी संपत्ती आहे, ही कायम जपली पाहीजे. दक्षिणेला गोठयाचे मुख असेल तर जनावरे दगाततात. कायम आजारी पड़तात, यांच्या औषध उपचारांवर भरपूर खर्च होतो, प्रमुख दरवाजा पूर्व किंवा उत्तर दिशेस घ्यावा, दक्षिण नसावा.
  • तुळशीला रोज पाणी घालावे. आरोग्य ज्यांना चांगले ठेवायचे आहे त्यांनी रोज सकाळी किंवा संध्याकाळी 15 मिनिटे तुळशीजवळ बसावे, ॐ नमो भगवते वासुदेवाय जप करुन तुळशीला पाणी घालावे व तुळशीच्या सान्निध्यात थोडा वेळ बसून पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या सभोवताली घ्यावी. लाभदायी ऊर्जा मिळाल्याने मन प्रसन्न होते, आरोग्य ही उत्तम राहते.
  • नवीन प्लॉट विकत घेताना कमीत कमी कॉर्नर कट असणारा विकत घ्यावा, चौकोनी किंवा आयताकृती आकाराची वास्तु नेहमी लाभते. त्रिकोणी षटकोन गोलाकार वास्तु घेतु नये. वास्तु तज्ञाचा सल्ला आवश्य घ्यावा.
  • आपण घरामध्ये लंबकाचे घड्याळ लावतो. कालांतराने सेल गेल्यास लंबक हालणे बंद होते. असे बंद ठेवणे म्हणजे आपण कामाची गती कमी करण्यासारखे आहे, त्यामुळे घड्याळ दुरुस्त करावे व ते सुरु ठेवावे.
  • दिवसभरात आपण फक्त जेवताना एकत्र येतो, त्यावेळेस वेगवेगळ्या विषयावर चर्चा होऊन, भांडणे, वादविवाद होऊन, एकत्रित भोजनाचा आनंद नाहीसा होतो व अन्नाबरोबर नकारात्मक ऊर्जा पोटात जाते व विविध आजार विकार बळावतात. जेवताना प्रसन्न मनाने, शांत चित्ताने, हसत चांगल्या गोष्टी बोलाव्यात यामुळे एकोपा वाढतो, आनंद वाढतो.
  • किचन ओटा नेहमी साफ़ ठेवावा रात्रीच्या वेळेस ओट्यावर उष्टे, खरकटे, कचरा व जेवणाची भांडी तशीच ठेवु नयेत. लक्ष्मी कृपावंत होण्यासाठी किचन सदैव स्वच्छ सुंदर ठेवावे.
  • आपल्या घराभोवती वातातरण शुद्ध रहावे यासाठी वड, पिंपळ, साग, बेल यासारखी वृक्ष लावावे, याबरोबर कडूलिंब लावावे. आजूबाजूच्या वातावणातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते, वाळलेल्या पानांमुळे जमिनीची शुद्धता होते, पानात औषधी गुण असल्याने कडूलिंबाचा वापर खाण्यासाठी होतो.
  • वास्तुदोषाचे लक्षण:- घरामध्ये ढेकुण होणे, वाळवी लागणे, पाली झुरळे होणे, जाळ्या जळमटे लागणे हे वास्तुदोषाचे लक्षण आहे, यासाठी पेस्टकंट्रोल करावे घर स्वच्छ ठेवावे व वास्तु कंसल्टंसी करुन आपले घर दोषमुक्त करावे.
  • पितळी कासवाची प्रतिमा देवघरात पुर्व-पश्चिम ठेवावी. कासव पाण्यात ठेवु नये. पाण्यातील क्षारामुळे खराब होते. लोखंडाचे असल्यास गंज लागतो. देवघरात देवाच्या पायापाशी खाली ठेवावे. कासव उंबऱ्यावर-दारात-खिडकीवर ठेवु नये. कासव प्रतिमेमुळे दिर्घायुष्य वाढते व शांतता लाभते.
  • आपल्या घरात जूने बंद पडलेले टी.व्ही, रेडीओ, घड्याळं, मिक्सर न वापरता येणारी भांडी अशा गोष्टी एका जागी बंदीस्त अवस्थेत राहिल्याने नकारात्मक ऊर्जा आजूबाजूला तयार करतात. आज लागेल उद्या लागेल पण 5-6 वर्षे त्यावस्तू कधीच लागणार नाहीत, अशा वस्तू काढून टाकाव्यात, त्यामुळे आपल्या मार्गातील अडथळे कमी होतात. घरातील ऍक्टिव्हनेस वाढतो नेहमी. आनंदी उत्साही वातावरण घरात राहते.
  • शेती, फार्महाऊस, कारखाना, बंगला या ठिकाणी नवीन विहीर बोअरींग घेताना ईशान्य, उत्तरेस वास्तुतज्ञाच्या सल्याने घ्यावी. दक्षिण, आग्नेय, नैऋत्य दिशेला खड्डा पाणी या गोष्टी वर्ज आहेत, यामुळे धन हानी आयुष्य हानी होते.
  • रोजचा स्वयंपाक करताना चीडचीड, राग-राग करु नये. स्वयंपाक करताना आनंदी मनाने करावा, यामुळे प्रत्येक पदार्थ रुचकर-सात्विक-पौष्टिक बनतात. मन अस्थिर असेल तर गाणी ऐकत स्वयंपाक करावा. आपण जे अन्न खातो त्याचा परिणाम आपल्या शरीरावर व मनावर होत असतो.
  • पाऊस, खराब वातावरण, सूर्यदर्शन नाही, वाहते पाणी, साचलेली डबकी यामुळे साथीचे रोग पसरतात. आपले घर सुरक्षित करण्यासाठी रोज भीमसेनी कापूर घरात २ वेळेस जाळावा, घरात फिरवावा.
  • घराची ईशान्य दिशा जल तत्वाची पाण्याची जागा आहे, या ठिकाणी लहान मुले आणि आजोबांची बेडरूम चालते, कर्ते कमावते व्यक्तीनी झोपू नये. यामुळे आरोग्यहानी धनहानी होते. बुध्दी तल्लख होते परंतू नोकरी व्यवसाय क्षेत्रात पराक्रम गाजवू शकत नाही. स्थिर दिर्घायूष्य मिळत नाही.
  • परीक्षेच्या कालावधीत घर शांत ठेवावे. मुलांची शालेय परीक्षा म्हणजे महत्वाचा कालावधी असतो, वर्षभर शिकलेल्या अभ्यासाची उजळणी करून चांगले मार्कस मिळवण्याची महत्वाची वेळ असते. यासाठी पालकांनी घरात भांडणे, वादविवाद, कलह न होईल याची काळजी घ्यावी. अनावश्यक पाहुणे मंडळी व त्यांचे बोलणे टाळावे, मुलांची मानसीकता यामुळे बिघडुन त्यांचा अभ्यासावर परीणाम होवू शकतो.
  • शुद्ध जल घरात शिंपडावे. तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवावे, त्यावरती उजवा हात ठेवून 107 वेळेस शुद्ध मनाने गायत्री मंत्र जप करावा. गायत्री मंत्राने शुद्ध केलेले पाणी घरात भिंतीच्या कडेने शिंपडावे यामुळे घरातील बाधा, निगेटिव्ह ऊर्जा, सूक्ष्म शक्तींचा त्रास नाहीसा होतो व घराला सुख शांती कायम मिळते.
  • तुळस दारात महत्वाची. तुळशीला आयुर्वेदिक महत्व आहे. आजुबाजूचे वातावरण पॉझिटिव्ह करण्यासाठी उपयोगी आहे. ज्या घरात तुळस टिकत नाही, वाढत नाही, तेथे दुषित ऊर्जा जास्त असते. अश्या वेळेस २ किंवा ३ कुंड्यात तुळस लावावी आणि वास्तु पॉझिटिव्ह करुन आपली वास्तु तस्थातू करावी.
  • वायव्येला तिजोरी नको. वायव्य दिशा वायुची आहे. या दिशेला स्थिरता नाही, चंचल ऊर्जा आहे. स्थिरता-भक्कम नसल्याने या ठिकाणी वायुतत्वामध्ये तिजोरी ठेवु नये, पैसा टिकत नाही. कमाईपेक्षा खर्च जास्त होतो. तिजोरी दक्षिण -नैऋत्येला ठेवावी.

Leave a Comment