पाण्याचे महत्व | Panyache Mahatva in Marathi

पाणी हे जीवन असे वाक्य आपण कुठे ना कुठे ऐकले असेलच, तर मग आज आपण ह्याच आपल्या जीवनावश्यक पाण्याचे महत्व जाणून घेणार आहोत.

तर मित्रांनो आज आपण आजच्या ह्या आर्टिकल मध्ये पाण्याचे महत्व ( Panyache Mahatva in Marathi ) आणि पाण्याचा उपयोग योग्य रित्या कसा करावा याच बद्दल बघणार आहोत.

पाण्याचे महत्व १०० शब्दांत | Uses of Water in Marathi

तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे पाणी हा आपल्या जीवनाचा एक अत्यंत आवश्यक आणि अविभाज्य भाग/ घटक आहे. कारण आपण पाण्याविना जास्त काळ जगू शकत नाही. पाण्यामुळे मनुष्यालाच काय तर पृथ्वीवरील प्रत्येक प्राण्याला जगण्यास आणि जिवंत राहण्यास मदत होते. प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या विकासासाठी आणि वाढीसाठी पाणी हे आवश्यक आहे.

पाणी हे परमेश्वराने या जगात निसर्गाच्या माध्यमातून दिलेली सर्वात मोठी व महत्त्वाची देणगी आहे. त्यामुळेच आपण पाणी एक नैसर्गिक संसाधन आहे असे म्हणतो. पाणी हे सर्व निसर्गासाठीच नव्हे तर सजीवांसाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त आहे.

मित्रानो आपण बघितले कि पाण्याचे महत्व आपल्या आयुष्यात किती आहे, चला तर आता आपण बघूया कि आपल्या सजीवांसाठी / मानवी शरीरासाठी पाण्याचे महत्व काय आहे आणि का आहे.

पाण्याचे महत्व – सजीवांसाठी / मानव शरीराचा भाग

पाणी म्हणजेच ज्याला आपण हिंदीत जल तर इंग्लिश मध्ये वॉटर ( Water ) असे म्हणतो. तर हाच घटक ज्याला आपण वेगवेगळ्या भाषेत पाणी, जल, वॉटर म्हणतो हा पृथ्वीवरील सर्व पशु-पक्षांचे, वनस्पतींचे आणि मनुष्याचे जीवन वाचविण्याचे काम करतो म्हणूनच कोणी पाण्याला जीवन तर कोणी “पाणी हेच जीवन” असे सुद्धा म्हणतात.

आपल्याला माहित आहे म्हणजे आपण सगळे शाळेत असतांना शिकलेलोच आहे कि मानवी शरीर हे 60% पाण्यानेच बनलेले आहे. मानव शरीर असलेल्या फुफ्फुसांमध्ये अंदाजे सुमारे 83% पाणी, मेंदू आणि हृदयात जवळपास 73% पाणी, स्नायू आणि मूत्रपिंडांमध्ये सुद्धा पाणी, आपल्या त्वचेत 64% तर एका मानवी शरीर हाडांमध्ये 31% पाणी असते.

अहो साधे आपल्या शरीरामध्ये रक्ताभिसरण प्रक्रिये पासून ते पचन आणि शरीराचे तापमान नियमित करण्यासाठी सुद्धा पाण्याची गरज पडते. ही सर्व कार्ये पार पाडण्यासाठी मानवी शरीराला सतत पाण्याची गरज असते. म्हणून आपल्याला पाण्याचे महत्व ( Panyache Mahatva in Marathi ), मराठी मध्ये आज मी या आर्टिकल च्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे.

तर मित्रांनो आपल्या ह्या मानवी शरीरास योग्यप्रकारे सतत कार्यशील राहाण्यासाठी सतत पाणीपुरवठा करणे खूप आवश्यक आहे, हे तुम्हाला समजले असेलच. म्हणून आता आपण पुढे जाऊया आणि बघूया पाण्याचे महत्व – दैनंदिन जीवनातील वापर.

पाण्याचे महत्व – दैनंदिन जीवनातील वापर

चला तर बघूया आपल्या दैनंदिन जीवनात पाण्याचे महत्व किती आहे. प्राणी असो किव्हा मनुष्य तो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पाण्याचा खूप प्रकारे उपयोग करतो. मनुष्य जीवनात पाणी हे फक्त पिण्यासाठीच वापरले जात नाही तर अजून कपडे, भांडी घासण्यासाठी, औद्योगिक क्षेत्रांमध्ये आणि इतर काही कामासाठी हि वापरले जाते. इतकेच नाही तर आपण मनुष्य पाण्यापासून वीज निर्मिती सुद्धा करतो.

पाण्याचे सर्वात मोठे महत्व म्हणजे शेती करण्यासाठी. कारण आपण पाण्याशिवाय कुठलेही पीक घेऊ शकत नाही आणि शेती हि करू शकत नाही. आणि जर आपण शेतीच केली नाही तर मग मनुष्याला म्हणजेच आपल्याला अन्न मिळू शकत नाही, त्यामुळेच मनुष्याच्या जीवनामध्ये पाण्याला खूप महत्त्वाचे (मोलाचे) स्थान आहे.

पाण्याचे प्रकार:

काय मग मित्रांनो तुम्हांला माहीतच आहे कि आपल्या पृथ्वीवर पाण्यामध्ये २ प्रकार आढळतात एक म्हणजे गोड पाणी आणि दुसरे म्हणजे खारट पाणी. आपल्याला खारे (खारट) पाणी हे जास्तकरून फक्त आणि फक्त समुद्रामध्येच पाहायला मिळते आणि गोड पाणी हे सरोवर, नद्या, विहिरी यांच्या मध्ये आढळते. मुख्यता मनुष्य आणि भूमीवरील प्राणी पिण्यासाठी गोड पाण्याचा वापर करतात आणि जे जलचर प्राणी असतात ते खारे च पाणी पितात.

पाण्याचे महत्व – वनस्पतींसाठी 

मानवाला / मनुष्याला जितकी पाण्याची गरज लागते तेवढीच गरज पृथ्वीवरील सर्व वनस्पतींना देखील आहे. कारण आपल्याला माहित आहे कि झाडे सुध्दा पाणी पितात ते आपल्या मुळांच्या माध्यमातून जमिनीतील पाणी शोषून घेतात. म्हणजेच थोडक्यात सांगायचे झालेच तर मनुष्याप्रमाणे झाडांना / वनस्पतींना वाढण्यासाठी सुध्दा पाण्याची गरज असते.


FAQ:

मनुष्य जीवनात पाण्याचे काय महत्व आहे?

पिण्यासाठी, शेतीसाठी, कपडे धुण्यासाठी, भांडी घासण्यासाठी आणि अजून बरेच कामासाठी पाण्याचे महत्व आहे.

World Water Day केव्हा साजरा केला जातो? 

22 मार्चला आपण World Water Day साजरा करतो.

आज काय शिकलो:

मित्रांनो आज आपण पाणी कसे वाचवावे, पाण्याचे उपयोग काय आहेत आणि दैनंदिन जीवनात पाण्याचे महत्व मराठी मध्ये ( Panyache Mahatva in Marathi ) बघितले. शाळेमध्ये जर तुम्हाला पाणी हेच जीवन निबंध लिहायला सांगितला असेल तर पाण्याविषयी माहिती देणारा हा निबंध तुम्हाला नक्कीच उपयुक्त होईल. चला तर आजच्या या आर्टिकल मध्ये इतकेच. पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन विषयावर नवीन माहिती सोबत.

Leave a Comment