शेअर मार्केट माहिती मराठी मध्ये | Share Market Information in Marathi

नमस्कार मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये आपण शेअर मार्केट माहिती मराठी मध्ये ( Share market information in marathi ) या विषयी माहिती घेणार आहोत. ज्यामध्ये आपण शेअर मार्केट काय आहे, Intraday Trading काय आहे, Stock Exchange काय आहे, Broker काय असतो, Broker चे प्रकार, शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी? हे सर्व आपण आज जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो आजच्या आर्टिकला सुरवात करूया.

शेअर मार्केट काय आहे?

सर्वांनी शेअर मार्केट बद्दल काही न काही ऐकलेले आहे, पण त्याबद्दल पूर्ण माहिती प्रत्येकाला नसते त्यामुळे त्याबद्दल लोकांमध्ये खूप गैरसमज आहेत. जसे कि खूप लोकांना वाटते कि शेअर बाजारात पैसे बुडतात. हो हे खरे आहे जर तुम्हाला शेअर बाजाराची पूर्ण माहिती नसेल आणि तरीही तुम्ही त्यात पैसे गुंतवले तर तुमचे पैसे बुडणारच. हे एखादा जुगार खेळण्यासारखेच आहे. कारण जर डॉक्टर ने कुठलाही सराव न करता ऑपेरेशन केले तर तो रुग्णाच्या जीवाशी खेळतोय. तसेच शेअर बाजारात कुठलीही माहिती नसतांनी केलेली गुतंवणूक हि नुकसानकारक ठरू शकते.

Share Market Trading म्हणजे काय?

शेअर बाजार एक अशी जागा आहे जेथे कंपनीचे शेअर ची देवाण घेवाण केली जाते. एक प्रकारे त्यांची खरेदी विक्री केली जाते. Share Market Trading म्हणजे शेअर ची खरेदी विक्री करणे. जर तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर घेतले तर तुम्ही त्या कंपनी चे भागीदार होता. तुम्ही जितके शेअर घेतले तितका तुमचा हिस्सा त्या कंपनी मध्ये असतो. शेअर बाजार मध्ये गुंतवणूक करण्या आधी तुम्हाला त्याची पूर्ण माहिती घ्यावी लागेल. त्यात पैसे कसे लावावे याचीही माहिती घ्यावी लागेल.

ट्रेडिंग मध्ये वेगळे वेगळे प्रकार पडतात ते मी तुम्हाला खाली सविस्तर मध्ये सांगणारच आहे. Trading चे प्रकार intraday, positional trading आणि long term trading असे आहेत ( शेअर बाजार गुंतवणूक ) याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Intraday Trading काय आहे?

या trading मध्ये शेअर एका दिवसात घेऊन त्याच दिवशी विकावा लागतो. म्हणजे जर तुम्ही शेअर सकाळी घेतला तर तो तुम्हाला मार्केट बंद होण्याच्या आधी विकावा लागेल. जेव्हा तुम्ही कुठला शेअर घेता तेव्हा तुम्ही तेथे तुमची Position तयार करता. Intraday मधे तुम्हाला तुमची Position दिवसा अखेरीस बंद करावी लागते. या ट्रेडिंग च्या प्रकाराला Intraday Trading म्हटले जाते. हा शेअर बाजार चा सर्वात जोखमी प्रकार आहे जर तुम्ही शेअर बाजार मध्ये नवीन असाल तर कृपया सुरवातीलाच या प्रकारामध्ये जाऊ नका आधी पूर्ण माहिती घ्या तेव्हाच या प्रकारचा विचार करा.

Positional Trading काय आहे? :

जसे Intraday मध्ये तुम्हाला शेअर ज्या दिवशी घेतला त्याच दिवशी विकावा लागत होता. पण Positional Trading च्या या प्रकारात तुम्ही आज घेतलेला शेअर उद्या विकू शकता किव्हा तुमच्या मनानुसार तुम्हाला हवा तसा विकू शकता. या प्रकारामध्ये तुम्हाला Technical Analysis करावे लागते त्यातून तुम्ही शेअर किती दिवसासाठी ठेवावा लागेल हे समजू शकते.

Long Term Trading ( शेअर बाजार गुंतवणूक ) :

या प्रकाराला शेअर बाजार गुंतवणूक असेही म्हटले जाते. जर तुमच्या कडे Intrady करण्यासाठी पुरेसा वेळ नसेल तर तुम्ही शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करू शकता. यासाठी तुम्हाला चांगल्या कंपनी निवडाव्या लागतील जेथे तुम्ही गुंतवणूक करू शकता. त्या कंपनीचे Fundamental म्हणजे कंपनीची माहिती जसे नफा, महसूल, मालमत्ता, दायित्वे आणि वाढीची क्षमता हे सर्व बघीतल्यावर तुम्हाला कंपनी मध्ये पैसे गुंतवायचे कि नाही हे समजते.

Stock Exchange काय आहे?

Stock Exchange म्हणजे अशी जागा आहे जेथे शेअरची खरेदी विक्री केली जाते. तुम्ही याला शेअर खरेदी विक्री करण्याचे दुकान म्हणू शकता. भारतामध्ये मुख्य २ exchange आहेत. पहिले BSE (Bombay Stock Exchange) आणि दुसरे NSE (National Stock Exchange). हे दोन्ही exchange मुंबईला आहेत. या exchange मधून तुम्ही तुमचे शेअर विकत घेऊ शकता. जसे तुम्हाला न्यायालयात जाण्यासाठी वकीलाची गरज असते तसेच exchange मधून शेअर घेण्यासाठी तुम्हाला Stock Broker ची गरज पडते. जाणून घेऊया Stock Broker कोण आहे.

Stock Broker कोण असतो?

Stock broker हा तुमच्या आणि exchange मधील असा व्यक्ती आहे जो कि तुमच्यासाठी शेअर ची देवाण-घेवाण करतो. तो शेअर ची देवाण घेवाण करण्यासाठी तुमच्या कडून काही पैसे घेतो त्या पैश्यांना brokerage असे म्हटले जाते. stock ब्रोकर चे प्रकार पुढील प्रमाणे:

Full Time Stock Broker :

याप्रकारीतील ब्रोकर तुम्हाला सर्वात जास्त सुविधा देतो, परंतु त्यांचे charges खूप जास्त असतात. यांच्या सुविधा मध्ये तुम्हाला stock सांगणे , फोन वरती माहिती देणे अश्या प्रकारच्या बऱ्याच सुविधा येतात. या सुविधा जास्त करून तुम्हाला बँक देतात. तुमचे ज्या बँकेत account असेल तिथे तुम्ही तुमचे Demat Account उघडू शकता.

Discount Stock Broker :

या प्रकारचा ब्रोकर तुम्हाला फक्त गरजेच्या सुविधा पुरवतो जसे stock घेणे आणि विकणे, mobile platform. हे तुम्हाला mobile वरून सहायता उपलब्ध करून देत नाही. जर तुम्ही शेअर बाजारात नवीन आहात तर तुम्ही नक्कीच या ब्रोकर पासून सुरुवात केली पाहिजे. याचे कारण असे कि हे तुमच्या कडून trading ची फीस कमी घेतील जेणे करून तुमचे शिकण्या मध्ये जास्त पैसे जाणार नाहीत. खाली काही Discount Stock Broker ची नावे दिली आहेत.

1) Angel Broking

2) Zerodha

3) Upstox

4) Groww App

सूचना : शेअर बाजाराची पूर्ण माहिती असल्याशिवाय त्यामधे पैसे गुंतवू नये.


FAQ :

Share Market किती वाजता बंद होते?

भारतीय Share Market दुपारी ३.३० ला बंद होते.

NIFTY काय आहे?

NIFTY हे NSE चे इंडेक्स आहे.

Leave a Comment