बिटकॉईन म्हणजे काय? क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? Cryptocurrency Bitcoin Marathi Mahiti

बिटकॉईन म्हणजे काय? Bitcoin Mhanje Kay?

बिटकॉइन ची निर्मिती 2009 मध्ये सातोशी नाकामोटो (Satoshi Nakamoto) नावाच्या एका व्यक्तीने केली आणि तो आजही जगासमोर आलेला नाही. (याचे कारण लेखाच्या शेवटी दिले आहे) सुरक्षित, ब्लॉकचेन आधारित नेटवर्कवर यशस्वीपणे व्यवहार रेकॉर्ड करणारी बिटकॉइन ही जगातील पहिली क्रिप्टो करन्सी आहे. बिटकॉईन ही बाजारातील एकूण भांडवल आणि ब्लॉकचेनवर त्याच्या संग्रहित डेटाच्या स्वरूपात मोजली जाणारी सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी आहे. हे क्रिप्टो चलन आभासी आहे. न दिसणारं आहे, एका 64 Hex कॅरेक्टर ऍड्रेस च्या मार्फत तुमचे सगळे व्यवहार होतात. आंतरराष्ट्रीय व्यवहार करणाऱ्या अनेक कंपन्यांनी आता बिटकॉइन मध्ये व्यवहार करायला सुरवात केलेली आहे. आणि ज्यांच्याकडे बिटकॉइन आहे ते ह्याच्याकडे गुंतवणूक म्हणून पाहताय. कारण ह्याचं मूल्य हे प्रचंड मोठं आहे, ते सतत बदलत असतं आणि त्यातून मोठे रिटर्न्स मिळतात.

बिटकॉइनवरचा वाढता विश्वास आणि इतर नावाजलेल्या कंपन्यांचे बिटकॉइन वापरून होत असलेले व्यवहार पाहता जगभरात आज १ ते २ कोटी लोक बिटकॉइनचा व्यवहार करतात. सुप्रीम कोर्टाच्या परवानगीनंतर आता अनेक कंपन्यांच्या क्रिप्टो करन्सी भारतामध्ये ट्रेड होत आहेत, परंतु त्यापैकी बिटकॉइन हा सर्वात उच्च स्थानावर आहे. म्हणजे ७ मे २०१३ साली एका बिटकॉइन ची किंमत होती रु.५८१४ आणि आज दिनांक ५ मे २०२१ रोजी एका बिटकॉइन ची किंमत झाली आहे ४० लाख रुपये. म्हणजेच हा भाव ८०००० पटीने वाढला आहे, १०%, २०% नाही तर ८००००%. ह्याचे दर हे सोने, पोस्ट किंवा बँकेतील FD च्या गुंतवणुकी सारखे ७ ते १०% नसून वार्षिक ८०% आहे. (CoinDesk.com च्या माहितीनुसार – https://www.coindesk.com/price/bitcoin)

ह्या Bitcoin किंवा इतर Crypto Currencies मध्ये गुंतवणूक करण्यासाठी जे प्लॅटफॉर्म वापरले जातात त्यांना म्हणतात Trading किंवा Exchange Apps. त्यातील एक विश्वासहार्य असे भारतीय वझीरेक्स एप (Download Wazirx) कसे वापरायचे याची माहिती लेखाच्या शेवटी विडिओ मध्ये दिली आहे.


बिटकॉइनचा २०१४ पासूनचा चार्ट

५ जास्त विकत घेतले जाणारे कॉईन्स (२४ तासातील वाढ)
(ज्यात नुकसान होण्याची भीती कमी आहे. कारण ह्यांची वाढ ही मागील काही वर्षात कायम चढत्या क्रमाने आहे.)


क्रिप्टोकरन्सी म्हणजे नेमकं काय? | Cryptocurrency Meaning In Marathi

लहान असतांना आपल्यापैकी अनेकांचा नवा व्यापार हा आवडता खेळ होता. इंग्लिशमध्ये याला ट्रेडिंग असे म्हणतात. या व्यापाराची सगळ्यात मजेशीर गोष्ट असायची, ती म्हणजे त्यातले पैसे आणि या पैशांनी करता येणारे व्यवहार. हे पैसे खोटे आहेत आभासी आहेत, हे आपल्याला माहिती असायचं. तरीही त्यातून एक वेगळीच मजा, आनंद मिळायचा. हे सगळं आत्ता आठवण्याचं कारण म्हणजे आत्ता सध्या चर्चेत असलेलं आभासी चलन, ते म्हणजे क्रिप्टोकरन्सी आणि सुप्रीम कोर्टाने त्याविषयी दिलेला निर्णय. सुप्रीम कोर्टाने नेमकं काय म्हटलंय. क्रिप्टोकरन्सी म्हणजे नेमकं काय? आपल्या आयुष्यावर याचा काय परिणाम होणार, आपण श्रीमंत होणार का? या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊया अगदी सोप्प्या भाषेमध्ये..

क्रिप्टो म्हणजे आभासी चलन, समजा माझ्याकडे १०० रुपयाची नोट आहे, हि नोट जर मी एखाद्या दुकानात दिली तर मला १०० रुपये मूल्याच्या गोष्टी विकत घेता येतील. पण क्रिप्टोच्या अश्या चलनी नोटा नसतात. हे एक डिजिटल चलन आहे, व्हर्च्युअली अस्तित्वात असतं. आणि ह्याचे सर्व व्यवहार देखील डिजिटल च होतात. हे चलन म्हणजे छापील चलनाला एक पर्याय आहे. भारतीय रुपया, अमेरिकन डॉलर, युरो किव्हा पाउंड यांच्यासारखे हे चलन नसते. हे चलन कोणत्याही एका देशाचे नाही, ते जगभरात लागू होतं, आणि जगभरातील कोणीही या क्रिप्टो करन्सीचे व्यवहार करू शकतात.

ब्लॉकचेन म्हणजे काय? | Blockchain information in Marathi

मग तुमच्या मनामध्ये असा प्रश्न येईल कि क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारांवर लक्ष कोण ठेवतं, भारतीय रुपयाच्या हालचालीवर लक्ष ठेवते रिझर्व्ह बँक. तुमच्या आमच्या खात्यावरील रकमेवर लक्ष ठेवते ती आपली बँक. क्रिप्टो करन्सीच्या बाबतीत असे घडत नाही. इथे एकाच वेळी लाखो कॉम्प्युटर्स तुमचे व्यवहार सुरक्षितपणे नोंदवून ठेवतात. म्हणजेच क्रिप्टो करन्सी वापरून तुम्ही एखादा व्यवहार केला कि त्याची नोंद एकाच वेळी लाखो कॉम्पुटर्समध्ये होते यालाच ब्लॉकचेन म्हणतात. एखादा कॉम्पुटर Hack करणं शक्य असतं, परंतु लाखो कॉम्प्युटर्स Hack करणं आणि त्यातली माहिती बदलणं शक्य नसतं. म्हणूनच ब्लॉकचेन च्या माध्यमातून होणारे क्रिप्टो करन्सीचे हे व्यवहार सुरक्षित मानले जातात, विश्वासहार्य मानले जातात.


क्रिप्टोकरन्सी बाबत कोर्टाने काय म्हटलंय ?

पाहूया नेमकं काय घडलंय? हो सुप्रीम कोर्टाने क्रिप्टोकरन्सी च्या ट्रेडिंग ला परवानगी दिलेली आहे. एप्रिल २०१८ मध्ये रिसर्व बँकेने क्रिप्टोकरन्सी च्या ट्रेडिंग वरती सरसकट बंदी आणली होती. कारण हि कोणत्याही देशाची करन्सी नसून त्यावर कोणाचेही शासन नाही. याला इन्टरनेट & मोबाईल अससोसिएशन ऑफ इंडिया ने सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. त्यांचं असं म्हणणं होतं कि भारताने जगाकडे बघायला हवे. अनेक देश आहेत जिथे क्रिप्टोकरन्सीचं ट्रेंडिंग होतं, अनेक देश आता स्वतःची क्रिप्टोकरन्सी लाँच करण्याच्या तयारीत आहेत. सुप्रीम कोर्टाने याविषयीचा निर्णय सुनावला आणि क्रिप्टोकरन्सी च्या ट्रेडिंग ला परवानगी दिली. म्हणजे आता तुम्ही आम्ही कायदेशीर रित्या क्रिप्टोकरन्सीचं ट्रेडिंग करू शकतो.


किती क्रिप्टो चलने आहेत?

जगभरामध्ये जसे रुपया डॉलर पाउंड यूरो अशी वेगवेगळी चलने आहेत तसेच ३००० पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिप्टोकरेन्सिज देखील आहेत बिटकॉइन, लिटकॉइन, रिपल, इथेरियम अश्या वेगळ्या प्रकारच्या क्रिप्टो करेंसी सध्या अस्तित्वात आहेत. फेसबुक देखील त्यांची लिब्रा नावाची क्रिप्टोकरेन्सि लाँच करायच्या तयारीत आहे. पण यातले सर्वात जास्त ऐकलेले जर नाव असेल तर बिटकॉइन. साधारण 2009 साली हे बिटकॉइन लाँच झालं होतं आणि आज २०२१ साली जगातील सर्वात टॉप चे चलन बनले आहे.


बिटकॉइन चा निर्माता कोण?

द बुक ऑफ सातोशी (लेखक: Phill) नुसार सातोशी नाकामोटो एक उच्च बुद्धिमत्ता असलेला गणितज्ञ, अर्थशास्रज्ञ, आणि एक चांगला टीम लीडर होता. बिटकॉइनच्या सॉफ्टवेअर ची निर्मिती ही त्याने C++ या प्रोग्रामिंग भाषेमध्ये केली होती. हा एक मुक्त (Open Source) प्रोजेक्ट असून तो MIT लायसन्स च्या अंतर्गत आहे. सुरवातीला सातोशी ह्या प्रोजेक्ट मध्ये एकटा होता आणि त्याने हा प्रोजेक्ट सोडल्यानंतर त्या टीम चे आज ४०० पेक्षा जास्त मुख्य लीड मेंबर्स आहेत. सातोशीची हा प्रोजेक्ट फक्त एकट्याचा असावा अशी कधीही इच्छा नव्हती, परंतु काही कारणास्तव त्याला या प्रोजेक्टमधून बाहेर यावे लागले. तो जगातून अदृश्य झाला. आणि ह्या प्रोजेक्ट चे क्रेडिट घेण्यासाठी जगासमोर कधीच नाही आला.


Bitcoin Mhanje Kay

क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक करून श्रीमंत होता येईल का???

याचं सरळ सोप्प् उत्तर आहे कि होता येईल. शेअरमार्केट आणि क्रिप्टो ट्रेडिंग मध्ये फायदा होण्यासाठी प्रत्येक कॉईन्स किव्हा शेअर ची योग्य माहिती त्याचा इतिहास, त्याच्या वर्तमान आणि भविष्यातील प्रकलपांची माहिती असणे गरजेचे आहे. तो आधी सुरक्षित होता का आणि पुढे त्यात गुंतवणूक केली पाहिजे का? हे जर समजायला लागले तर नक्की आपण आपल्या गुंतवणुकीवर अगदी कमी वेळात फायदा घेऊ शकतो. नावाजलेल्या कंपन्यांचे शेअर आणि बराच काळ मार्केटमध्ये स्थिर असणाऱ्या कॉईन्स मध्ये गुंतवणूक केल्यास फायदा होऊ शकतो.

त्यासाठी तुम्हाला प्रत्येक कॉईन्सचा मागील एक वर्षाचा विकासाचा चार्ट पाहावा लागेल जो मी वर दिलेला आहे. आणि केवळ मी सुचवलेले फक्त ५ कॉईन्स सुरवातीला प्रॅक्टिस म्हणून वापरून पाहावे लागतील. गुंतवणूक ही अगदी १०० रुपयांपासून ही करता येईल आणि जसे जसे तुम्ही त्यातून शिकत जाल आणि तुमचा आत्मविश्वास वाढत जाईल तुम्ही स्वतःच कोणत्याही कॉईन्स ची ट्रेडिंग करू शकाल. (आज बिटकॉइन ची किंमत ४० लाख रुपये आहे, १० वर्षांपूर्वी ५००० होती, म्हणजे बिटकॉइन तेव्हा घेतला असता तरी आज काही नुकसान झाले नसते. आणि जर आजची ४० लाखांची किंमत पुढील काही वर्षात जर १ करोडवर गेली तर??????)

बिटकॉइन विकत घेऊन फायदा होईल का?

गव्हर्मेंट भारतीय रुपयाची प्रिंट कितीही छापू शकते त्याला मर्यादा नाही. परंतु बिटकॉइन हे फक्त २१ मिलियन म्हणजेच २ करोड १० लाखच उपलब्ध आहेत. आणि प्रत्येक १० मिनिटाला काही ठराविकच बिटकॉइन उपल्बध होतील असे सातोशीने त्याच्या सिस्टिम मध्ये हार्ड कोड करून ठेवले आहे. म्हणजे त्यापेक्षा जास्त बिटकॉइन हे तयार होऊच शकत नाहीत आणि शेवटचा बिटकॉइन हा २०४१ साली विकला जाईल असे हे जबरदस्त मॉडेल आहे. म्हणूनच सातोशी ची बिटकॉइन प्रोग्रामिंग ची ही संकल्पना (Blockchain) वाखाणण्याजोगी आहे. ब्लॉकचेन ही कन्सेप्ट २५६ क्यारेक्टरच्या Hash Key वर आधारित असल्यामुळे ती Hack होणं शक्यच नाही अर्थात impossible आहे.

म्हणजे यावरून असे समजते कि बिटकॉइन हे लिमिटेड २०४० पर्यंतच असल्यामुळे त्याची मागणी ही खूप असेल. आणि डिमांड आणि सप्लाय मुळे त्याचा भाव हा दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे आणि आजचा लाखोंमधला भाव २०४० पर्यंत करोडोमधे असू शकेल. जसे सोने हे बनवले जात नाही तर ते खाणींमध्ये लिमिटेड आहे आणि त्याचे प्रमाण हे एक दिवस संपणारच आहे. म्हणून मागणी जास्त आणि साठा कमी असल्यामुळे सोन्याच्या भावातही कायम वाढच दिसते.


बिटकॉइन किव्हा इतर क्रिप्टोकरेन्सिज कश्या विकत घ्यायच्या?

सोपे आहे. भारतात आणि इतर देशात सर्व मिळून अश्या १०० पेक्षाही जास्त क्रिप्टोकरेन्सिज आहेत. ज्या आपण इंडियन रुपये (INR) देऊन विकत घेऊ शकतो. उदा. बिटकॉइन विकत घ्यायचा झाल्यास संपूर्ण १ बिटकॉइन ज्याची किंमत ४३ लाख रुपये आहे तो न घेता आपण त्याचा एक छोटासा पार्ट १०० किव्हा २०० रुपये देऊन पॉईंट्स मध्ये देखील विकत घेऊ शकतो. जगभरात यासाठी 50 हुन अधिक मोबाईल एप्स आणि वेबसाईट आहेत, त्यात ही काही मोजकी अशी विश्वासू एप्स आहेत जी तुम्हाला प्रत्येक ट्रेडिंग करण्यासाठी लागणारी फी अगदी कमी दरात घेतात (उदा.०.२%) आणि जिथे तुम्ही सोप्प्या पद्धतीने ह्या करन्सी ट्रेड करू शकता आणि भारतीय कस्टमर केअर शी बोलून अँप वापरताना काही टेकनिकल प्रॉब्लेम आल्यास ते सोडवू शकता. ( उदा. फंड डिपॉझिट अथवा बँकेत काढता न येणं). आपण भारतीय असल्याने मी तुम्हाला भारतातले विश्वासाहार्य वझीर एक्स (Download WazirX App) वापर करण्याचा सल्ला देईन.

वझीरेक्स एप मी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून Chrome Browser मध्ये ओपन करून तुम्ही SIGN UP फॉर्म भरू शकता. Sign Up झाल्यावर Login केल्यानंतर तुम्हाला तुमच्या वझीरेक्स वॉलेट मध्ये पैसे डिपॉझिट करण्याआधी Pan Card आणि Adhar Card अपलोड करून KYC करायची आहे. जी फक्त ५ मिनटात होऊन जाईल.( खाली दिलेला विडिओ पहावा). KYC हे तुमचे पैसे वझीरक्स Wallet मध्ये सुरक्षित राहण्यासाठी आणि तुम्ही एक खरे ट्रेडर आहात यासाठी एक पुरावा आहे.


🔥चेतावनी🔥:कोणतीही शेअरमार्केट किव्हा क्रिप्टो करन्सी यात चढ उत्तर चालूच असतात. कंपनीच्या उलाढालीनुसार किंमत कमी जास्त होत असते. याचे भवितव्य कोणीही वर्तवू शकत नाही, परंतु मागील घडामोडी पाहून अंदाज बांधला जाऊ शकतो आणि जास्त नुकसान होण्यापासून वाचता येते. वरील गोष्टींमध्ये पैसे गुंतवताना कर्ज काढू नये किव्हा आपल्या उत्पन्नातील तेवढाच भाग वापरावा ज्याने कि काही नुकसान जरी झाले तरी त्याचा तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होणार नाही.

Download WazirX App

तुम्हाला जर Sign Up करतांना Referral Code विचारला गेला तर कृपया हा कोड टाकावा – h52zz42v


क्रिप्टोकरन्सी जिंकण्याच्या Tricks

तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कंमेंटमध्ये लिहायला विसरू नका. पुढील काही दिवसात मी तुमच्यासाठी २ नवीन जिंकण्याच्या Tricks घेऊन येणार आहे. ज्या इथेच लिहणार आहे. त्यामुळे या पानावर भेट देत राहा.

TIP 1: जेव्हा वरील दिल्येला चार्टनुसार कॉइन चा भाव हा खाली आलेला असेल, म्हणजेच लाल रंगात दर्शवत असेल, त्यावेळी गुंतवणूक करावी, कारण किंमत कमी होणं ही एक मोठी संधी असते आणि तिथून खाली आलेला भाव पुन्हा वर जाण्याची शक्यता असते.

TIP 2: जर दररोज ट्रेडिंग करत असाल तर घेतलेला कॉइन २% ते ३% प्रॉफिट झालेला असताना लगेच विकून टाकावा, कारण मार्केट मध्ये चढ उतार हे चालूच असतात. तो विकून तुम्ही पुन्हा भाव खाली गेल्यावर नवीन कॉइनमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता.

TIP 3: जर चांगल्या कॉइनमध्ये गुंतवणूक केली असेल आणि अचानक जर भाव जरी खाली आला तरी गरज नसतांना तो लगेच विकू नये. कारण तो पुन्हा वाढणार आहेच. होल्ड करून संयम ठेवल्यास काही दिवसात तो वर गेल्यावर तुम्ही तो विकू शकता.( उदा. बिटकॉइन हा नेहमी वाढतच आहे )

सातोशी ने प्रोजेक्ट मधून एक्सिट का केले?

जो निर्माता असतो त्याचे त्याच्या निर्मितीवर खूप जास्त प्रेम असते, जसे एखाद्या कलाकाराचे स्वतःवर खूप कमी प्रेम असतं पण त्याने जी कला तयार केली आहे त्यावर अतिशय जीवापाड प्रेम असतं. आई चे आपल्या निर्मिती म्हणजेच आपल्या मुलावर खूप प्रेम असतं. तसेच सातोशी ची निर्मिती बिटकॉइन होती आणि ती त्याने ठरवलेल्या संकल्पनेनुसार चालवण्यासाठी अडथळे निर्माण केले गेले.

२०१० साली Wikileaks ह्या नावाजलेल्या वेबसाईटवर बऱ्याच अमेरिकन देशांनी वापरण्यासाठी बंदी आणली होती. तिला मिळण्याऱ्या देणगी चे अनेक मार्ग जसे की Paypal, Visa, Bank Payment Gateways देखील बंद करण्यात आले. यामुळे Wikileaks ने पर्याय म्हणून त्यांची वेबसाईट ही दुसऱ्या देशात स्थापित करून कोणाचेही नियंत्रण नसलेल्या बिटकॉइन चा देणगी स्वीकारण्यासाठी वापर सुरु केला. सातोशी ला ही गोष्ट माहित झाल्यावर त्याने Wikileaks ला बिटकॉइन न वापरण्याची विनंती केली. आणि सांगितले कि जर तुम्ही ती वापरत राहिला तर बिटकॉइन ही एक पायरेटेड (आक्षेपार्ह) करन्सी होऊन जाईल आणि माझ्या निर्मितीला, ज्या चांगल्या उद्देशाने मी ती बनवली होती तिला बट्टा लागेल. आणि मी बनवलेली संपूर्ण कन्सेप्ट खराब होऊन जाईल. परंतु Wikileaks ने त्यांना आम्हाला पर्याय नसल्याने आम्ही बिटकॉईनच वापरू असे सांगितले.

Wikileaks च्या या निर्णयामुळे सातोशीला हे वाईट वाटले आणि सातोशीने १२ डिसेंबर २०१० रोजी जगाला शेवटचा मेल पाठवला आणि त्यात लिहले कि, विकिलिक्स सोडून जर दुसऱ्या कोणीही बिटकॉइन वापरला असता तर मला आनंद झाला असता. पण Wikileaks ने असे करून आमच्यापुढे एक मोठी समस्या निर्माण केली आहे. असे म्हणून त्यांनी बिटकॉइन प्रोजेक्ट मधून एक्सिट केले आणि हा प्रोजेक्ट त्याच प्रोजेक्टमधील सहकारी Gavin Wood च्या हातात दिला, जो आता इथेरिअम कॉइन चा सहसंस्थपाक आहे. २०१२ नंतर बिटकॉइन ला पाहून जगात ब्लॉकचेनवर आधारित अनेक क्रिप्टोकरन्सी आल्या आणि त्या सुरक्षितरित्या सुरु आहेत.

Bitcoin & Crypto Investment Offers

क्रिप्टो गुंतवणुकीवर मिळवा १२% व्याजदर – Download Vauld App
मिळवा $१० किमतीचे बिटकॉइन मोफत – Download Nexo App

3 thoughts on “बिटकॉईन म्हणजे काय? क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? Cryptocurrency Bitcoin Marathi Mahiti”

  1. खूप उपयुक्त माहिती डिलीत सर, आभारी आहे ??

    Reply
    • धन्यवाद! बिटकॉइन काही दिवसात जगातील एकमेव डिजिटल करन्सी असेल..

      Reply

Leave a Comment